वर्ष २५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु. सावित्रीबाई फुले मुलीचे वसतिगृह. छ. संभाजीनगर

श्री महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह 
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, हर्सूल ते पिसादेवी रोड, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर

येथे माळी समाजातील 10 वी नंतर महाविद्यलयीन, व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या हुशार, गरीब, शेतमजुर ,शेतकरी व ग्रामीण कुटुंबातील मुलींसाठी, मोफत निवास वसतीगृह व्यवस्था ही सामाजिक तत्वावर असुन त्यासाठी विद्यार्थिनींनी दिनांक 10 जून 2025 पासून वसतीगृहातून अर्ज घेऊन किंवा मो. क्रमांक 8855 881828 व्हाट्सअप वर योग्य ती माहिती देऊन अर्ज मागून घ्यावा.
दि. 22/06/2025 रविवारी सकाळी 10:00 ते दुपारी 02:00 पर्यंत विद्यार्थिनीने आपल्या अर्जासोबत माळी जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता पेपरच्या झेरॉक्स आणि आई – वडील/ पालकांना सोबत घेऊनच मुलाखती साठी येणे आवश्यक आहे,
पात्र विद्यार्थिनींची यादी दि.29/06/2025 रोजी वसतिगृहात आणि व्हाट्सएपच्या च्या माध्यमातून प्रकाशित होईल, दि.07/07/2025 पासुन वसतीगृह नियमित सुरुवात होईल.

असे वस्तीगृह प्रमुख, मंडळ प्रमुख, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

👉👉टीप..
1) छत्रपती संभाजीनगर व परिसरातील निवासी विद्यार्थिनींना यात प्रवेश मिळणार नाही.
2) सर्वांना सुचित करण्यात येते की मंडळाच्या 88 55 88 1828 या मोबाईल नंबर वरून आलेला फॉर्मच स्वीकारला जाईल कारण येथे संपूर्ण नोंदणी करून क्रमांक दिला जाईल त्यानंतरच आपल्याला फॉर्म पाठवण्यात येईल. त्यामुळे दुसऱ्यांना हा फॉर्म पाठवू नये किंवा झेरॉक्स काढून चालणार नाही तरी कृपया सर्वांनी नोंद घ्यावी3) हा मेसेज कृपया सर्वांनी आपल्या माळी समाजाच्या वेगवेगळ्या ग्रुप वर पाठविण्याची कृपा करावी जेणेकरून याचा लाभ गरजवंत मुलींना घेता येईल‌.

या कामी समाजातील जाणकार समाज बांधवांनी समाजातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन व सहकार्य करावे ही मंडळाच्या वतीने विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *