समाज व वधु वर परिचय मेळावा १८ जानेवारी २०२६ रोजी संपन्न.

समाज व वधु वर परिचय मेळावा १८ जानेवारी २०२६ रोजी संपन्न.

महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद च्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणारा माळी समाज व वधु वर परिचय मेळावा दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालय जळगाव रोड, औरंगाबाद येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. श्री. डॉ दीपक अमृता गवळी यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री बाबुराव केशवराव घोगडे आण्णा यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास वधू-वरांचा व मराठवाडा, खानदेश, विदर्भ तसेच महाराष्ट्रातून आलेल्या समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
समाज बांधवांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मंडळातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार….

 

 

कार्यक्रमा दरम्यान टिपलेले क्षण.

Search