सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह उत्घातन सोहळा संपन्न.

सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह उत्घातन सोहळा संपन्न

       श्री महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ छत्रपती संभाजीनगर तर्फे सुरू होत असलेल्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहाचा उद्घाटन समारंभ माननीय मंत्री श्री अतुल सावे साहेब यांच्या हस्ते समाज बांधवांच्या व मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ऋचा इंजीनियरिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री गणपत जिते यांनी भूषविले याप्रसंगी मंत्री अतुल सावे साहेब यांनी संबोधित करताना समाजातील मुलींनी या वस्तीगृहाचा लाभ घेऊन आपले उच्च शिक्षणाचे ध्येय गाठावे असे सांगत मंडळाच्या कार्याचे व सहकाऱ्यांचे कौतुक केले व मंडळास सदैव सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणपत जिते यांनी मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा समाजाने लाभ घेऊन मंडळास उर्वरित सुविधा निर्माण करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करत मंडळाने समाजाच्या औद्योगिक प्रगतीसाठी उपक्रम राबवावे असे प्रतिपादन केले. तसेच याप्रसंगी डॉ राजेंद्र धनवई यांनी समाजातील मुलींनी वस्तीगृहात प्रवेश घेऊन आपले शिक्षणाचे ध्येय साध्य करावे असे सांगत मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करून वस्तीगृहातील प्रवेशासाठी मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन समाज बांधवांना केले. श्री मदन काका नवपुते यांनी मंडळाच्या उपक्रमांना सहकार्य करण्याची भावना बोलून दाखवत मंडळाच्या आज वरील कार्याचे कौतुक करत मंडळाच्या सर्व सदस्यांना प्रोत्साहित केले. श्री भरत काळे सरांनी आपल्या संबोधनात मंडळाच्या या वस्तीगृहाला श्री साळूबा पांडव यांनी जागा देऊन मुलींच्या वस्तीगृहाचे काम आपल्या दातृत्व भावनेतून सोपे केल्याने त्यांचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले श्री सैलुबा उबाळे साहेब यांनी रू 51000 निधी पुन्हा दिला यापूर्वीही श्री सैलुबा उबाळे साहेबांनी रू. 100000 (एक लाख रुपये) व एक बंक बेड (रू. 15000) मंडळाच्या वस्तीगृहासाठी दिलेला आहे तसेच प्रा. श्री सुधाकर गीते पिंपळगाव (हरेश्वर) रु. 5051 (पाच हजार एक्कावन), श्री अंकुश गोरे अंधारी यांनी रु 1100, तर श्री मनोज बोरसे यांनी त्यांच्या आई कै. आनंदाबाई बोरसे यांच्या स्मरणार्थ रु 5000 देणगी मंडळास दिली.
कार्यक्रमास सर्व श्री संजय सोनवणे, डॉ. उत्तमराव काळवणे, शंकर जाधव सरपंच पहुर, व्ही जी शहाणे, पोपटराव दाबके, नारायण फाळके, रत्नाकर फाळके सर, शिवनाथ मालकर,बाळू बल्लाळ आसेगाव, गंगाराम सेठ, मधुकर सोनवणे आमभई , पंडित पांडव बबन नाना शिरसागर अंधारी सोमीनाथ जाधव, गजानन घोंगटे रघुनाथ पांडव भराडि, भरत देसाई, सौ सुभद्रा जाधव सौ. शालिनी बुंदे व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन सौ पुष्पलता गोरे यांनी केले तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे समाज बांधवांचे श्री संतोष गोरे यांनी मंडळाच्या वतीने आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ सुमन राऊत, सर्वश्री रमेश बावस्कर, काशिनाथ जाधव भराडीकर, भगवान सोनवणे, गणेश काळे, रामराव राऊत, साईनाथ जाधव, अशोक गोरे, उमेश उबाळे, गणेश हिवाळे, काशिनाथ जाधव, उदयभान शेलेकर, दीपक शहाणे, गणेश शहाणे,यांनी परिश्रम घेतले.

श्री सैलुबा उबाळे साहेब यांनी रू 51000 निधी पुन्हा दिला यापूर्वीही श्री सैलुबा उबाळे साहेबांनी रू. 100000 (एक लाख रुपये) व एक बंक बेड (रू. 15000) मंडळाच्या वस्तीगृहासाठी दिलेला आहे एकून त्यांनी १००००० + १५००० + ५०००० = १,६५,०००/- रुपये निधी दिला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *