About Us
संस्थेची उद्दिष्टे
- औरंगाबाद येथे मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु करणे .
- शाळा, महाविदयालये , संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करणे .
- व्यवसाय / नौकरी मार्गदर्शन केंद्र चालविणे .
- आधुनिक शेती प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करणे .
- विवाह नोंदणी व सामुदायिक विवाह लावणे .
- मंगल कार्यलयची व्यवस्था करणे .
मंडळाबाबत :
समाज विकासाचा ध्यास घेऊन वर्ष २००७ मध्ये स्थापन झालेल्या महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाच्या वतीने बरेच कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वधू वर परिचय मेळावा. .
मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून व आपल्या आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम प्रतिवर्षी यशस्वी होत आहे. समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रगती घडावी यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील असते. या वधू वर व समाज बांधव मेळावा या कार्यक्रमाध्ये प्रकाशीत करण्यात येणाऱ्या माध्यमातून आता पर्यंत अनेक विवाह संबंध घडून आले असून त्यानंतरही समाजाला याचा फायदा होवो हीच संत सावंता चरणी मंडळातर्फे प्रार्थना. मंडळातर्फे महापुरुषाच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करून समाज बांधवाना एकत्रित आणने, समाज प्रबोधनपर व्याखाने, सावता पुण्यतिथी आयोजित करणे, याप्रमाणे मंडळ नेहमी असेच काही उपक्रम राबवत राहील. औरंगाबाद सारख्या शहरात माळी समाजाचे मंगल कार्यालय व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यर्थ्यासाठी एखादे वसतिगृह असावे असे मंडळाला वाटते, समाज बांधवानी सहकार्य केल्यास हे सहज शक्य होईल.






















Testimonials
गंगाधर गोरे
प्रत्येकाचं मनामध्ये समाजासाठी करण्यासाठी उत्सुकता असते परंतु सुरुवात कुठून करावी हेच माहित नसते त्यासाठीच, आपण महात्मा फुले मंडळामार्फत विविध कार्यक्रम दरवर्षी करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी हि आपण एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी महत्वाचे पाऊल उचलावे आणि पुढील कार्यक्रम मध्ये प्रत्यक्षी सहभागी व्हावे.

काशीनाथ जाधव
महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ विविध कार्यक्रम करून समाजाला एकत्र आणण्याचे काम अनेक दिवसापासून करत आहे त्यामुळे आपण हि आपला सहभाग नोंदवावा आणि समजलं विविध घटका मध्ये पुढे आणावे हेच मंडळाचे उद्दिष्ट आहे, समजतील वाईट चालीरीती बंद करणे . समजतील वधू वर करीत वधू वर मेळावे घेऊन कमी खर्चात लग्न करण्यास समजवून सांगणे किंवा समाजास तयार करणे.

रमेश बावस्कर
अनेक दिवसापासून समाजासाठी काहीतरी करावे असे वाटत असतांना समाजातील काही व्यक्तींशी मी चर्चा करून 2007 मध्ये महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. समाज विकास आणि समाज सुधारणा यासाठी मंडळ गेल्या 13 वर्ष पासून प्रयत्न करत आहे.वधु वर व समाज बांधव माहिती पुस्तिका तयार केली.इतर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम मंडळ राबवीत असते यापुढेही राबवत राहणार.
