समाज व वधु वर परिचय मेळावा २१ जानेवारी २०२४ रोजी संपन्न.
महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद च्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणारा माळी समाज व वधु वर परिचय मेळावा दिनांक 2१ जानेवारी २०२४ रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालय जळगाव रोड, औरंगाबाद येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. श्री. लक्ष्मण नामदेव गोरे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कॅबिनेट मंत्री श्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास वधू-वरांचा व मराठवाडा, खानदेश, विदर्भ तसेच महाराष्ट्रातून आलेल्या समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
समाज बांधवांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मंडळातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार….

