दि.19 डिसेंबर 2021- रविवार रोजी महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद तर्फे हर्सूल पिसादेवी रोड वर सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीगृहाचे भूमिपूजन संभाजी नगर पूर्व चे माननीय आमदार अतुलजी सावे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.सैलुबा किसनराव उबाळे हे होते,
प्रमुख पाहुणे मदन काका नवपुते, डि . के. पांडव, डॉक्टर राजेंद्र धनवई, डॉक्टर राम नवपुते डॉक्टर उत्तमराव काळवणे, संपतराव शिंदे, सुभद्राबाई जाधव होते.
या वसतिगृहासाठी साळुबा पांडव यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चौधरी,
सूत्रसंचालन गंगाधर गोरे व पुष्पलता शहाणे यांनी केले
तर आभार प्रदर्शन रमेश बावस्कर यांनी केले.
वस्तीगृह बांधकामासाठी समाज बांधवांनी सढळ हाताने मदत केली. सर्व प्रमुख पाहुण्यांनी समाजाने आणखीही सढळ हाताने मदत करावी असे आवाहन समाज बांधवांना केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.














