मंडळाबाबत

समाज विकासाचा ध्यास घेऊन वर्ष २००७ मध्ये स्थापन झालेल्या महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाच्या वतीने बरेच कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वधू वर परिचय मेळावा.

        मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातून व आपल्या आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम प्रतिवर्षी यशस्वी होत आहे. समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रगती घडावी यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील असते. या वधू वर व समाज बांधव मेळावा या कार्यक्रमाध्ये प्रकाशीत करण्यात येणाऱ्या माध्यमातून आता पर्यंत अनेक विवाह संबंध घडून आले असून त्यानंतरही समाजाला याचा फायदा होवो हीच संत सावंता चरणी मंडळातर्फे प्रार्थना. मंडळातर्फे महापुरुषाच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करून समाज बांधवाना एकत्रित आणने, समाज प्रबोधनपर व्याखाने, सावता पुण्यतिथी आयोजित करणे, याप्रमाणे मंडळ नेहमी असेच काही उपक्रम राबवत राहील. औरंगाबाद सारख्या शहरात माळी समाजाचे मंगल कार्यालय व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यर्थ्यासाठी एखादे वसतिगृह असावे असे मंडळाला वाटते, समाज बांधवानी सहकार्य केल्यास हे सहज शक्य होईल. 
प्रतिक्रिया