समाज व वधु वर परिचय मेळावा २२ जानेवारी २०२३ रोजी संपन्न.
महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ औरंगाबाद च्या वतीने प्रतिवर्षी घेण्यात येणारा माळी समाज व वधु वर परिचय मेळावा आज दिनांक 22 जानेवारी २०२३ रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालय जळगाव रोड, औरंगाबाद येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रभाकर राव चव्हाण साहेब यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कॅबिनेट मंत्री श्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमात समाजातील गुणवंत व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला
तसेच श्री भरतभाई माळी व श्री सुखदेवराव गीते पिंपळगाव हरेश्वर यांचा मंडळाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले… या कार्यक्रमास वधू-वरांचा व मराठवाडा, खानदेश, विदर्भ तसेच महाराष्ट्रातून आलेल्या समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
समाज बांधवांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मंडळातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार….